नकोस मिटू पापण्या

Started by sachinikam, April 01, 2015, 05:38:52 PM

Previous topic - Next topic

sachinikam

नकोस मिटू पापण्या

नकोस मिटू  पापण्या, पिऊ देना मधुरामृत
नकोस मिटू पाकळ्या, न्हाऊ देना परिमळात तृप्त

भाषा ही डोळ्यांची डोळ्यांना समजली
ओठांनी बोलण्याआधी हृदयाला उमजली

भिरभिरती नजर आता इथे स्थिरावली
एकरूप सवे जाहली नि सारी दुनिया दुरावली

श्वास थोडा मंदावला नि पुन्हा धावला
स्पंदने जरा थबकली नि नव्याने आवेगली
कसे विलक्षण झाले क्षणात किमया घडली
आधी ना कधी अशी बेधुंद प्रीत जडली

नकोस मिटू  पापण्या, पिऊ देना प्रीतगंध
नकोस मिटू पाकळ्या, भिनुदे रोमारोमांत परमानंद

कवितासंग्रह : मुकुलगंध
कवी : सचिन निकम
पुणे
9890016825
sachinikam@gmail.com