तिने केले प्रेम

Started by sachinikam, April 02, 2015, 12:02:10 PM

Previous topic - Next topic

sachinikam

तिने केले प्रेम

तिने केले प्रेम बेसुमार त्याच्यावर
टाकल ओवाळून मन बेफिकीर त्याच्यावर
पाहिली वाट त्याची दिसेपर्यंत तो
लागता चाहूल त्याची हर्ष रोमरोमांत दरवळतो

एकदा भिडल्या नजरा जुळल्या हृदयांच्या तारा
लागले भेटू दोघे फुलला आसमंत सारा
नव्हते कसलेच भान होते बेधुंद युगुल छान
कसमे वादे प्यार वाफ, झाले दो दिल एक जान

तिने आपल्या प्रेमाचा एकदिवशी केला उलगडा
वाचला समोर त्याच्या अबोल प्रीतीचा धडा
कळूनही नाही कळले त्या भावनाशून्याला
पाषाणहृदयी शेवटी भेट अश्रूंची देऊन दुरावला

झाले कठीण विसरणे जपलेल्या भावनांना
उरल्या फक्त आता आठवणींच्या यातना
त्याच काय तो कसाही सावरेल
तिने केल प्रेम खर तिला कोण आवरेल .

कवितासंग्रह : मुग्धमन
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com