नारी तुझे रुपे अनेक

Started by Gajendra Valvi, April 07, 2015, 04:02:27 PM

Previous topic - Next topic

Gajendra Valvi

तू चंचल
मन निर्मळ
व्यवहारी कुशलता
सदैवि समर्पिता
तूच अशी एक
नारी तुझे रुपे अनेक

नदी सारखे चालणे
समुद्राला मिळने
आभाळा एवढी छाया तुझी
तूच अशी एक
नारी तुझे रुपे अनेक

सृष्टि ची तू कीर्ति
सुजानपणाची तू मुर्ति
स्वाभिमान जपणारी
तूच अशी एक
नारी तुझे रुपे अनेक

मायेची तू सावली
क्रोधी तू महाकाली
तू समृद्धि वरदे लक्ष्मी
तू ज्ञान वरदे सरस्वती
तूच अशी एक
नारी तुझे रुपे अनेक

गजेंद्र वळवि