माझ्या वाटा

Started by शिवाजी सांगळे, April 07, 2015, 08:24:35 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

माझ्या वाटा

जगणे नियमात जरी जगाच्या
ध्येय्य माझे मीच ठरवितो,
कितीही असोत मार्ग खडतर
माझ्याच वाटा मी चालतो !

दंगतो आनंदे काव्या रंगी
साहित्यात मी नित्य रमतो,
जगण्या उरल्या दाहीदिशांत
माझ्याच वाटा मी चालतो !

जीवन असे हे नवरसयुक्त
प्राशन करूनी तरी तहाणतो,
अनवट स्त्रोत शोधित नवे
माझ्याच वाटा मी चालतो !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९