त्या गारठलेल्या संध्याकाळी

Started by Gajendra Valvi, April 08, 2015, 05:39:14 PM

Previous topic - Next topic

Gajendra Valvi

हिवाळ्यातली ती भेट आपली
तू रुसलेलिस माझ्या वरी
खुप सुंदर दिसत होतिस
त्या गारठलेल्या संध्याकाळी

मग माझे तुला मनवने सुरु होई
पण तुझा राग काही कमी नाही होई
खुप भांडलेलिस तू माझ्याशी
त्या गारठलेल्या संध्याकाळी

त्याच क्षणी हात तुझा घट्ट धरुनी हाती
जवळ घेतले तुला माझ्या घट्ट मिठित
डोळे तुझे पानावलेले
त्या गारठलेल्या संध्याकाळी

तुझी न माझ्या भेटीची
अविस्मर्णीय अशी मिठी
खरच किती प्रेमदायि होती
त्या गारठलेल्या संध्याकाळी

गजेंद्र वळवि