इतरांना हसवताना..

Started by Shubhankar Chandere, April 09, 2015, 11:07:05 AM

Previous topic - Next topic

Shubhankar Chandere

इतरांना हसवताना
स्वतःला विसरलास तू
अचानक निघून गेलास
मित्रा रडवलस तू
   इतक्या वर्षाची सोबत
   कशी संपली कळलेच नाही
   आता आता तर आमच्यात होतास
   कधी दुरावलास कळलेच नाही
तुझे हसने, तुझे हसवने
कधी न विसरन्या सारखे
त्या विनोदांवर आमचे हसने
कधी न विसरन्या सारखे
   हसवन्याचा विडा उचलला होतास तू
    सर्वांना अर्ध्यावर सोडुन देवास हसवायला गेलास तू
    तुझ्या ह्या माय-बाप प्रेक्षकांस
                   क्षनार्धात पोरक करुन गेलास तू
बहरदार खेळ माडलास तू
   ढंगात खुब लढलास तू
  वगातला राजा होतास ना तू
  मग प्रजेला सोडन का गेलास, तू

तुझ्यासारखी महान मुर्ती
पुन्हा कधीच जन्मणार नाही
आमच्यामदली तुझी पोकळी
कधीच भरुन निघनार नाही
     
-शुभंकर