भांडण

Started by prasad gawand, April 10, 2015, 04:47:45 PM

Previous topic - Next topic

prasad gawand

भांडण

भांडण म्हणजे आपल्या वाढत्या नात्यातला एक गूढ असावं
उमलत्या भावनांसह ह्या गुलाबी थंडीत भिजण्याच निमित्त असावं
दोघांच्या भावनांना एकाच blanket मध्ये गुरफटून घ्याव
दोघांचे आयुष्य दोन नसून एकच असाव ....

तुला हसताना पाहिल्यावर वाटत आपण एवढे दिवस का नाही बोललो
ते दिवस मिळवण्यासाठी भूतकाळात का नाही गेलो
पण खरच कालच अवखळ बोलणं बघून एकदम बावरलो ...
बोलता बोलता खरच तुझ्या शब्दांमध्ये हरवलो ...... 

प्रसाद गावंड