नको नको रे पावसा !!!

Started by Rajesh khakre, April 13, 2015, 10:27:21 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

नको नको रे पावसा नको कोसळू अवेळी
नको जीव घेऊ त्यांचा पीके माझी ती कोवळी

जीव ओतला रे माझ्या पिकात मी सारा
कालु नको त्यात विष बरसवून तू गारा

बिघडला माणूस आज दोष तुला कसा देऊ
तूच रहावे प्रामाणिक मी तुला कसे म्हणू

खाऊन अन्न आज माणूस बेईमान झाला
निसर्गाचे,माणुसकीचे भान उरले ना त्याला

मी तरी अजून ही राखतो मातीशी इमान
नाही खोट माझ्या मनी त्याची ठेव तू जाण

माझे पोट शेतीवरी तुझ्या विश्वासाचा ठेवा
तू असा कोपल्यावरी अश्रु दाखवू कुणाला

तूच एकदा ठरव आता मी काय करावे
जगावे विश्वासाने किंवा झुरत मरावे
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com




शितल


शितल

बिघडला माणूस आज दोष तुला कसा देऊ
तूच रहावे प्रामाणिक मी तुला कसे म्हणू

खाऊन अन्न आज माणूस बेईमान झाला
निसर्गाचे,माणुसकीचे भान उरले ना त्याला
:)