उधार

Started by धनंजय आवाळे, April 13, 2015, 11:55:28 AM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

येणे तुझे होता डोळा दाटे अंधार
भीती  मज वाटे काय मागणार उधार


उधारीचा तुझा काय वर्णावा छंद
दर्शनमात्रे होई बाजार बंद


उधारीची तुझ्या काय सांगावी किर्ती
दुकाने कित्येक पडली धारातिर्थी


उधारीत तु काय काय लुटले
चड्डी सह नाडे ही ना सुटले


देऊन उधार जे झाले कंगाल
कुत्रेही ना खाई आज त्यांचे हाल


घेऊनीया उधार त्वा व्हावे पसार
लिहून वाढले वह्यांचे भार


वाटते तुझा आता करावा सत्कार
पण देईना कोण उधारीत हार

Jawahar Doshi

Chaan Kavita ahe. Sundar