तू समीप येता

Started by sachinikam, April 13, 2015, 12:27:42 PM

Previous topic - Next topic

sachinikam

तू समीप येता

तू समीप येता, दीप मनी मिणमिणले
धुंद गंधित वारे हळूच कानी गुणगुणले

तू समीप येता, घंटा मंदिरी किणकिणल्या
निरभ्र काळोख्या नभी टपोर चांदण्या टिमटिमल्या

तू समीप येता, श्रावणधारा रिमझिमल्या
हर्षोल्हासित मयुरपिसारा पाहुनी लांडोर्या थुईथुईल्या

तू समीप येता, जीभ शब्दांत अडखळली
काळजातली गुपित गाणी नयनांतुनी दरवळली
सागरा भेटावया सरिता सरसावूनी कळवळली
मिलिंदा भेटावया सुमने कळ्यांची हरवळली

तू समीप येता, वाटे जग सारे नवे
तू समोरी अशी राहा सौख्य हेचि मला हवे

तू समीप येता, आवेगली स्पंदने
वाटे मिठीत घ्यावे तोडूनी सारी बंधने.

कवी : सचिन निकम
कवितासंग्रह: मुक्तस्पंदन
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com


अस्मिता

तू निघून जाता दूर, हाय, थांबती माझी "स्पंदने"
कुठली मिठी नि कुठले काय, कुठली सारी बंधने?

sachinikam

तू समीप येता, आवेगली स्पंदने
वाटे मिठीत घ्यावे तोडूनी सारी बंधने.