नशा

Started by शिवाजी सांगळे, April 13, 2015, 03:49:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नशा
 
तुझी कविता मला आवडते
खुपदा तीच असं म्हणायची,
कधी लाडाने कधी हट्टाने
वाचुन कौतुक ती हसायची !

खुप दिवस चाललं असं
सवय लागली मला लिहायची,
कसली नशा? कशी धुंदी?
लिहीताना मात्र मला चढायची !

अजुनही नशा नाही गेली
प्रेम तेंव्हा, आता विरहाची,
गेली ती केंव्हाच दूरदेशी
नशा कधी ही उतरायची?

आवडत होती कविता तीला
तीच हे कायम म्हणायची,
सोडून आठवणी ती गेली
मी कविता का लिहायची?


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९