* हा भिमराव माझा *

Started by धनराज होवाळ, April 14, 2015, 12:45:53 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

आई माझी रमाई,
बाप माझा भिमा..
भिमसैनिकाची गोष्ट,
मी सांगतोय तुम्हा..!!

दलितांचा तो राजा,
हा विश्वरत्न माझा..
प्रत्येकाच्या हृदयात,
हा भिमराव माझा..!!

त्या चवदार तळ्याची,
मिठास त्याने चाखली..
मग दृष्ट ब्राह्मंणांची मान,
बाबासाहेबांपुढे वाकली..!!

अरे शुद्र लोकांनाही त्याने,
बेधडक जगणं शिकवलं..
त्यांची अस्पुर्शता काढून,
जणु स्वर्गात त्यांना घडवलं..!!

जिथे दलितांना शिक्षण नव्हतं,
बाबांनी मुलींना ही शिकवलं..
माझ्या आई-बापामुळे जणु,
गरीबाघरी अमृतच पिकवलं..!!

आज अभिमानाने जगतोय,
कारण बाबांची पुण्याई आहे..
एकदा "जय भिम" बोलण्यात पण,
पदरात बाबांची कमाई आहे..!!

अरे महापुरुष तो माझा,
जो दलितांसाठी झिरपला..
पसरली जगात शोककळा,
तो विश्वरत्न माझा हरपला...!!!

परमपुज्य महापुरुष विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंतीच्या सर्व भिमसैनिकांना हर्दिक हर्दिक शुभेच्छा..
आणि बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम...
!!__/\__!!

....जय भिम.....
..जय शिवराय...
-
एक कट्टर भिमसैनिक,
प्रेमवेडा राजकुमार

स्वलिखीत..
(धनराज होवाळ)
9080679949