नसतं तेच नाते

Started by Rashmi Vinod Pawar, April 14, 2015, 10:26:30 PM

Previous topic - Next topic

Rashmi Vinod Pawar

नसतं तेच नातं


नसतं तेच नाते
त्याच्याच जवळ जावसं वाटे 
सख्या सोयरयांचा सहवस नकोसा वाटे

नसतं तेच नाते
आठवण येताच लगेच रडू येते
हृदय अगदी भरभररून जाते
           
नसतं तेच नाते 
हाक मारण्याआधीच धाऊन येते
दिखाव्याचे सोंग करणं जमतच नसते

नसतं तेच नाते
विश्वासाने मन प्रसन्न राहते
हृदयाच्या यादीत त्याचं नाव आपोआपच प्रथम येते



                        रश्मी......