याद तुझी येता प्रिये …

Started by djyashwante, April 16, 2015, 01:44:16 PM

Previous topic - Next topic

djyashwante

याद तुझी येता प्रिये ...
मन मोहरून गेले,

विसरलो मी मलाच
तुज विसरणे कठीण झाले !

वसंत प्रितीचा बहरता ...
नभही भरुनी आले,

आठवणी बरसल्या अश्या
ह्रदय ओलेचिंब झाले !

शब्द शब्द वेचतना...
प्रेमबंध हे जुळे,

दरवळे प्रेमगंध हा
अबोल प्रीत फुले !

याद तुझी येता प्रिये ...

..........कवी - दिपक यशवंते  "मैत्रेय"....