अरसिका

Started by धनंजय आवाळे, April 19, 2015, 10:28:54 AM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

डोळ्यांपुढे ठेऊन तिजला शब्दांना शब्द मिळवले
करूनी  बेरीज  वजाबाकी   यमकांचे गणित जुळवले

कल्पनेच्या डोहामध्ये मारले अनेक सूर
शोधता काव्यमोती भरून आला ऊर

रक्तानेच लिहनार होतो तुझ्यासाठी काव्यलेखन
पण सुकून गेलो असतो म्हणून वापरले पेन

अक्षरात असे गुंफले सखे तुझे मी रूप
वाचून कविता माझी कोण म्हणेल तुला कुरूप?

कविता लिहून नेटकी केली तिला सादर
देवाकडे मागणे एकच ना बघो तिचा फादर

आवडेल तिला कविता अशीच होती खात्री
अभिप्राय उत्सुकतेने झोप ही ना आली रात्री

पण

अरसिका  ऐसी कैसी केलास मजवरी घाव
कवितेच्याच कागदात बांधलास तु वडापाव

काव्याची उर्मी माझी काढलीस अशी मोडून
कविताच गिळालीस तु वडापावचे लचके तोडून

. . . . . . . . धनंजय

Jawahar Doshi