माझा देव खरा फक्त...

Started by विक्रांत, April 19, 2015, 08:42:43 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



कृष्ण हवाय आम्हाला
बुद्ध हवाय आम्हाला
येशू हवाय आम्हाला
पायी डोकं ठेवायला

भट हवाय आम्हाला
भन्ते हवाय आम्हाला
पाद्री पूजा करायला
मध्यस्थ भला चांगला

तीच माती पुण्यवान
तोच धातू मुल्यवान
तोच अलभ्य पाषाण
आणि पाचदा अजाण

स्पष्ट साठला मनात
तोच एक घट्ट हट्ट
माझा देव खरा फक्त
इतरांचे व्यर्थ कष्ट

विक्रांत प्रभाकर