गळतय आभाळ

Started by sanjay limbaji bansode, April 22, 2015, 01:35:21 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

गळतय आभाळ
बसवा त्याला पाचर
भलत्याच वेळी फुटला
त्यातून पाझर ! !

गळक्या ठिकाणी
जाऊन लावा बाल्टी
पावसाळा आल्यावर
रानात करा उलटी ! !

शेतकऱ्याच्या शिव्याने
एवढा तो पेटला
दोन तीन महीने अगोदरच
झोपेतून उठला ! !

येऊन त्याने शेतात
केली पाण्याची फवारणी
विचार येऊन रायला
का करू आताच पेरणी ! !

पावसाळा येईस्तोर
एक पीक निघेल
तेव्हढच बाप्पा माझ्या
पोटापाण्याच भागेल ! !



संजय बनसोडे
9819444028