परी की काय जणू!

Started by sachinikam, April 22, 2015, 05:27:57 PM

Previous topic - Next topic

sachinikam

परी की काय जणू !

जाई जुई मोगरा निशिगंध
चाफा चमेली गुलाब जास्वंद
चालली घेउनि परडी फुलांची
परी की काय जणू ही अस्मानाची

हळुवार नाजूक अलगद पाऊले
नयनरम्य दृश्य या डोळी पाहिले
शुचिर्भूत दर्शने घंटानाद मंदिरी
परी की काय जणू ही स्वप्नसुंदरी

मृगनयनी मदनकन्या भासे मज रूपमती
जडावे सहजच मन अशी तिची रती
जाहलो मंत्रमुग्ध झाली आतुर भेटण्या मती
परी की काय जणू ही लावण्यवती

कवी :  सचिन  निकम
कवितासंग्रह : मुग्धमन
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com