दिवस निघून गेले ते

Started by धनंजय आवाळे, April 22, 2015, 11:11:47 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

दिवस निघून गेले ते
वेडं स्वप्न पाहायचे
एक नजर फक्त
आणि प्रेम व्हायचे

भरूनी  रंग पंखात
फुलपाखरू उडायचे
गंध घेऊनी फुलांचा
पाकळ्यात दडायचे

वेणीच्या फुलांनमध्ये
फुल होऊन रहायचे
दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे

विखुरलेल्या शब्दांना
एका सुरात बांधणे
दिवसाही पडायचे
आभाळात चांदणे

चांदण्यांच्या चंद्रमौळी
प्रकाशात न्हायचे
दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे 

ओठांवर शीळ घेऊन
नुसतेच चालायचे
तोंड न उघडता
डोळ्यांनी बोलायचे

भावनांच्या वाहत्या
प्रवाहात वहायचे
दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे




चित्रांगदा

दिवस निघून गेले ते
झाले एके दिशी
कुणा एकीशी लगीन
झाली पुढे दोन
मुले यथाकाल
अन्‌ करुनी खर्डेघाशी
कुण्या एका हपिशी
करतो माझा संसार