सूर्योदय

Started by sanjay limbaji bansode, April 23, 2015, 07:49:45 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

हिंदुस्तानातील त्या शुद्रासाठी अथांग अंधार होता.
काळाच्या बंधनात अडकलेली ती एक अमावस्या होती.
त्या किर्र काळोखात मनु राक्षस शुद्राच्या छाताडावर तांडव करत त्या अफाट काळोखात हिंडत होता.
त्यांना चीरडत होता, त्यांना बडवीत होता, त्यांना असह्य वेदना देत होता.
मनूच्या क्रूरकर्माने चीरडलेला शूद्र ओरडत होता दयेची भीक मागित होता.
पण त्यांचा आवाज त्या अंधारात दबल्या गेला, मनूच्या पायाखाली चीरडत गेला.
पीढ्यान पीढ्या असेच होत गेले. आता त्या सर्वाना त्या अथांग किर्र अंधाराची सवय झाली.
पण त्या काळोखात चमत्कार झाला त्या अथांग अंधारात एक तेजस्वी तारा चमकला. त्याने त्या अंधारात राहूनच त्या अंधाराला नाहीसे केले.
त्या तेजस्वी ताऱ्याचे, तारा नव्हे त्या तेजस्वी सूर्याचे नाव होते " डॉ. भीमराव रामजी आंबेडकर "

जय भीम



संजय बनसोडे
9819444028