शब्दगंधा

Started by Parshuram Sondge, April 28, 2015, 06:42:56 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

तुझेच भास सारे.....!!
तू नसलीस तरी तुझा सदैव भास होता
आठवांच्या पूरात कोंडलेला श्वास होता .

त्या वठलेल्या वडाला पुसू कशी खुशाली ?
त्या आणांची,त्या भाकांची बोलू लागला बोली

आोळखीची वाट ती पुढे गहीवरूनी आली 
तिथेच होती जरा सांडलेली तुझ्या गालची लाली

त्या झांडाना त्या वेलींना सांगू कसे सारे खरे
उधळून गेलीस तू का मांडलेले डाव सारे ..?

परशुराम सोंडगे,पाटोदा
9422291312

नि
Pprshu1312