आई

Started by Ravi kamble, April 28, 2015, 12:18:11 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

(आज ही देवदाशी जोगतिन या रुढी पंरपंरांचा सामना काही माता बघिनिना  करावा लागतो त्यातूनच सुचलेली ही कविता)

* आई *

करून करून काळजी रडत होती आई
काळजासाठी तिच्या झुरत होती आई

जगाशी ती झुंज देवुन लढत होती आई
रोज जगुण रोज मरून जगत होती आई

काळजाच्या पिल्लाला कशी जगवत होती आई
स्वतः उपाशी राहुन पोर वाढवत होती आई

देवदाशी म्हणुन वावरत होती आई
न पाहिलेल्या बाबांचा ही लाड पुरवत होती आई

जोगतीन या रूढी पंरपरेत फसली होती आई
माझ्या पासुन तीची ओळख लपवत होती आई

माझ्यात ती तीच स्वप्न बघत होती आई
मला दुरवर ठेवुन माझ्या साठीच जगत होती आई

(रवींद्र कांबळे पुणे 9970291212)