जर हयात असता तुका?

Started by sanjay limbaji bansode, April 28, 2015, 05:58:09 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

जर हयात असता तुका
बघुनी भ्रष्टाचारी चुका
झाला असता मुका
कायमचा.

बघुनी बुवा बाबांचा रंग
झाला असता आतूनी भंग
मंग कसले असते अभंग
तुकाचे.

देवाचे बघून उणे
सांगे कुणा गाऱ्हाने
मंग काय तुका म्हणे
अभंगांत.

बघुनी भिक्षुकी शाळा
बघुनी मंदिरी घोटाळा
काय सांगिल तुकाचा गळा
जनता जनार्दना.

वाटली असती तया खंत
दाटुनि आला असता कंठ
ना दिसले असते वैकुंठ
तुकारामा.


(तुका हयात असता तर ? ही एक कविची कल्पना आहे )

संजय बनसोडे
9819444028