श्वास मोकळे झाले

Started by धनंजय आवाळे, April 29, 2015, 02:55:21 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

डोळ्यातील ढगांचे श्वास मोकळे झाले
साचलेल्या मनाचे आकाश  मोकळे झाले

निघून गेला होता कुडी मधून जीव
जिंदा असण्याचे भास मोकळे झाले

गुलामीलाच आमुची वाटून गेली लाज
तुझ्या चरणांचे दास मोकळे झाले

पोटामधील आगीत जळून गेली भूक
कंठात अडकलेले घास मोकळे झाले

सांगू कशास आता कुणाशीही मी नाते
पायातील बेड्यांचे फास मोकळे झाले

विझवून टाकले होते देव्हार्यातले दिवे मी
देव दिसण्याचे आभास मोकळे झाले




. . . . . . . . धनंजय . . . . .  . .