स्मृती धुनी

Started by विक्रांत, April 30, 2015, 09:31:57 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

अजूनही माझ्या मनी
गुंजतात तीच गाणी
अडकल्या श्वासातुनी
शब्द येतात धावुनी

येणार ना जरी इथे
परतुनी कधी कुणी
व्याकुळतो प्राण माझा
कासावीस कोंदाटुनी

सांजवेळी पक्षी जाती
घरोट्यात परतुनी
पारावरी उदास मी 
दिशा घेती वेटाळूनी

दिलीस का ओढ अशी 
आस मनी जागवुनी
होवूनिया स्मृती धुनी
जाळतेय क्षणोक्षणी

इवलाले कवडसे
जाती मनी चमकुनी
मिटतात पापण्या नि 
येते आकाश भरुनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/