तडका - महाराष्ट्र माझा

Started by vishal maske, May 01, 2015, 08:12:42 AM

Previous topic - Next topic

vishal maske

महाराष्ट्र माझा

घडले कित्तेक पराक्रम
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये
किंचितही ना पडला मागे
जगाच्याही या गतीमध्ये

या महाराष्ट्रातल्या किर्तीचा
जगभरातही पडघम आहे
असाच होईल गौरव सदैव
अहो या मातीतच दम आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरुन डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर 9730573783