प्रेमात पडण म्हणजे काय ?

Started by sachinikam, May 01, 2015, 01:20:35 PM

Previous topic - Next topic

sachinikam

प्रेमात पडण म्हणजे काय ?

प्रेमात पडण म्हणजे काय ?
दोन जीवांना लागलेली ओढ की पुन्हा पुन्हा भेटण्याचे वेड
दोन देहांचे मधुरमिलन की एकरूप झालेली स्पंदन

प्रेम म्हणजे देणगी दैवी
प्रेम म्हणजे राग भैरवी
प्रेम म्हणजे भेट अमुल्य
प्रेम म्हणजे अनुभूती अतुल्य

प्रेमात पडलेल पाहून लोक हसतीलही
जणू काय प्रेमात नव्हे खड्ड्यात पडल्यासारख
प्रेमात पडलेल पाहून लोक फसतीलही
जणू काय प्रेमात नव्हे अड्ड्यात हरल्यासारख

हाच बोयफ्रेंड मिळावा म्हणून काहीजणी बाप्पाला नवस बोलतात
हीच गर्लफ्रेंड मिळावी म्हणून दीडशहाणे शिकवणी घेत बसतात

प्रेम काही बाजारात नाही मिळत विकत
आणि जरी मिळाल तरी जास्त नाही टिकत

त्यात काय विशेष प्रेम तर पशुपाक्ष्यांनाही होत
हेच तर विशेष आहे प्रेम चराचरांत स्थित आहे

प्रेमात पडण म्हणजे काय ?
दोन जीवांचा जिव्हाळा की एकमेकांना लागलेला लळा
दोन मनांचा संगम की स्वप्नसृष्टी विहंगम .

कवी : सचिन निकम
कवितासंग्रह : मुकुलगंध
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com

sachinikam

प्रेम म्हणजे देणगी दैवी
प्रेम म्हणजे राग भैरवी
प्रेम म्हणजे भेट अमुल्य
प्रेम म्हणजे अनुभूती अतुल्य