कामगार दीन

Started by sanjay limbaji bansode, May 01, 2015, 06:07:56 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

आज कामगार दीन, जे जे कामगार कंपनीत पर्मनेंट आहेत त्यांचे जीवन आज सुरक्षित आहे. पण जे कामगार आज वर्षानुवर्ष कांट्रेक्टवर आहेत त्यांचे काय ?  ना त्यांची कधी पगार वाढत, ना त्यांना कुठली पॉलिसी भेटत,  त्यांना बारा बारा तास काम करावे लागते, उलटे त्यांना जी पगार वरून दिलेली असते त्यातही हे ठेकेदार लोके ताव मारतात. तशाच काही कामगारांचे हाल मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला.



कोणतेही सरकार आले तरी
माझी तीच ती दशा
कशाले देऊन रायले भाऊ
कामगार दिनाच्या शुभेच्छा ! !

ईन्क्रीमेंट माझ, बढ़ता बढ़त नाही
सहा हजाराच्या पुढं
पगार माझा वाढत नाही
फ्रीज कूलर पाहिजे तर
हप्त्यावर मला मिळत नाही
विनवणी केली कितीही
तरी बोलते, भाऊ हप्ते तु फेडत नाही
थंड पाणी प्यायची
असते माझ्याही पोराची ईच्छा !
कशाले देऊन रायले भाऊ
कामगार दीनाच्या शुभेच्छा ! !

राशन पाणी भरून उधार
झालो मी बेजार
क्रेडिट कार्ड मागितले तर
साहेब बोलतात, पगार पाहिजे तीस हजार
तीस हजारवाल्याला, क्रेडिट कार्ड कशाला ?
खरे सांगा भाऊ, खरी गरज कुणाला ?
कष्टकरी माणसावर आज लक्ष नाही कुणाचं
हड़ताल जरी करीत नाही आम्ही
तरी ऐका आमच्याही मनाचं
लेकराला पोटभर भेटावे हीच आमची ईच्छा
कशाले देऊन रायले भाऊ
कामगार दीनाच्या शुभेच्छा ! !

घरखर्च चालवायचा, असते आम्हां चॅलेंज
कधीही गेलो तरी, असते बँकेत झिरो बॅलन्स
दुःखमय हे आमचे जीवन नाही होते चेंज
मेहनतीच्या कामातून आम्ही नाही होत एक्सचेंज
मंत्री आमदार भाऊ, आम्हाही भेट द्या सदिच्छा !
कशाले देऊन रायले भाऊ
कामगार दिनाच्या शुभेच्छा ! !


संजय बनसोडे
9819444028