तू एक शब्द....

Started by Parshuram Sondge, May 03, 2015, 05:42:49 PM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

तू
एक शब्द सापडत नसलेल्या
कवितेसारखी मनात घोळत राहतेस.
तू
पाहिलेस असतील माझ्या चेह-यावर
तुझ्या प्रेमाचे मुके उत्सव
तू
शब्द होऊन काळजा भोवती घोंगावत
राहतेस माश्यासारखी.
चिगदाळलेल्या काळजातून माझ्या
वाहत राहतेस पाणी शब्द बनून....

एका चिंरतन कवितेसाठी.....

. . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
            9422076739
Pprshu1312

मालती

माझ्या चेह-यावर
तुझ्या प्रेमाचे मुके उत्सव

अय्या, मुके?


चेतन

शब्द होऊन काळजा भोवती घोंगावत
राहतेस माश्यासारखी.

टीप - घोंगावणारे मासे चीनमधल्या यांगत्झे नदीत सापडतात.