पोलिस बाबा

Started by Ravi kamble, May 04, 2015, 02:08:38 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

असे काय झाले हो बाबा
का सोडुन गेलात सांगा ना
नाही हो आमच्या काहीच अपेक्षा
तुम्ही घरी परत या ना

नका हो देऊ वेळ आम्हाला
वा नका देऊ वेळ कुठल्या सणा
पण सोडुन जाऊ नका
तुम्ही घरी परत या ना

कर्तव्यदक्ष पोलिस तुम्ही
ना कधीच व्यक्त केल्या यातना
मग आमच काय चुकल का बाबा
तुम्ही घरी परत या ना

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)