खेळ लपाछपीचा

Started by sachinikam, May 05, 2015, 05:21:51 PM

Previous topic - Next topic

sachinikam

खेळ लपाछपीचा

लागल्या खेळू नजरा खेळ लपाछपीचा
लागला जुळु हळुवार मेळ स्पंदनांचा

किंचित स्मित गाली, मिचकावुनी डोळ्यांची भाषा
माझ्याही चेहऱ्यावर उमटल्या प्रतिबिंबाच्या रेषा

निखळ निर्मळ निरागस प्रीत
मिळाली सबब गाण्यास जीवनसंगीत

हळुवार ढळली बट चेहऱ्यावरती
नको फुंकू तोऱ्यात, उडवूस वाऱ्यावरती

तू आलीस नि गेलीस मी अजुनी इथेच उभा
पाठलाग सावलीचा, धूसर झाली मंद दिनप्रभा

फक्त एकदाच मागे वळूनी पाहशील ना
गुपित मनातले कळवळूनि सांगशील ना

लागल्या खेळू नजरा खेळ लपाछपीचा
लागला जुळु हळुवार मेळ स्पंदनांचा

घुटमळतोय इथेच फक्त तुला पहावया
आडोश्यामागुन पाहतोय चेहरा, पुन्हा तुला भेटावया .

कवी : सचिन निकम
कवितासंग्रह : मुकुलगंध
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com

खेळ लपाछपीचा

खेळ लपाछपीचा

लागल्या खेळू नजरा खेळ लपाछपीचा
लागला जुळु हळुवार मेळ स्पंदनांचा

किंचित स्मित गाली, मिचकावुनी डोळ्यांची भाषा
माझ्याही चेहऱ्यावर उमटल्या प्रतिबिंबाच्या रेषा

निखळ निर्मळ निरागस प्रीत
मिळाली सबब गाण्यास जीवनसंगीत

हळुवार ढळली बट चेहऱ्यावरती
नको फुंकू तोऱ्यात, उडवूस वाऱ्यावरती

तू आलीस नि गेलीस मी अजुनी इथेच उभा
पाठलाग सावलीचा, धूसर झाली मंद दिनप्रभा

फक्त एकदाच मागे वळूनी पाहशील ना
गुपित मनातले कळवळूनि सांगशील ना

लागल्या खेळू नजरा खेळ लपाछपीचा
लागला जुळु हळुवार मेळ स्पंदनांचा

घुटमळतोय इथेच फक्त तुला पहावया
आडोश्यामागुन पाहतोय चेहरा, पुन्हा तुला भेटावया .