तुझे रूप

Started by धनंजय आवाळे, May 09, 2015, 11:43:28 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

तुझे रूप डोळ्यात सांभाळतो मी
तुझ्या आठवणी पुन्हा चाळतो मी

सुखानींच केला असा घात माझा
दुखेःच हल्ली कुरवाळतो मी

जगण्यास इथे कोण आले आहे?
मरणांस माझ्या हाताळतो मी

मला नको ऊब तुझ्या सांत्वनांची
उपेक्षेचे निखारे उरात जाळतो मी


ना कधीच आले वास्तवाचे भान
झोपेत स्वप्ने चुरगाळतो मी


. . . . . धनंजय   . . . . .