ओलेपण

Started by kumudini, May 11, 2015, 06:27:50 PM

Previous topic - Next topic

kumudini

            ओलेपण

चांदणे  नभीचे वीतळाया  लागले
आभाळी  तेज  शशीचे  विरघळाया  लागले
आर्द्र  वारे  मलयगिरीचे  वाहण्या  लागले
सूर्य ओलाच  होता  तेज  त्याचे  फाकलेले
सळसळूनी  हिरवी  पाने  गात  होते  गीत  ओले
दवाचे  मोती  कंठी  फुलांनी  माळलेले
उमलुनीया  पाकळ्या  भ्रमरास  त्यांनी चुम्बीयेले
सुस्नांत  अवनीचे  लावण्यहि  होतेच  ओले
ओलेपणा  हा  आगळा  सौन्दर्य  जो  खुलवितो
भावनांना  ओलावणारा  तो  मनाला  भावतो

कुमुदिनी  काळीकर

सतिश

तुमच्या कविता दर्जेदार आहेत. तुमच्या आणखीही कविता वाचायला आवडतील.