स्वप्न

Started by kumudini, May 11, 2015, 06:53:50 PM

Previous topic - Next topic

kumudini

स्वप्न

मैफिल  संपलेली
सूर  मागे  राहियेले
अमृताने  चिंब  ओले
नक्षत्री  नाह्लेले
गंध  होते  चांदण्याचे
लावण्य  ते  चंद्रीकेचे
स्पर्श  मोराच्या  पिसाचे
हवेहवेसे  वाटणारे
किणकिण  होती  कंकणाची
नाद  होते  धुंद्णारे
काळजाला  छेडणारे
चित्र  ते  रेखणारे
ते  विश्व  माझेच  होते
त्या  सुखाच्या  लहरीत
मी  एकटी  नाहत होते
ते  स्वप्न  माझेच  होते

कुमुदिनी  काळीकर