वेदना आईच्या

Started by Ravi kamble, May 12, 2015, 09:01:48 AM

Previous topic - Next topic

Ravi kamble

नऊ महीने नऊ दिवस
सोसल्यास तु कळा
अखंड परिश्रमाने
जन्म दिला तु बाळा

मी जगात येण्या आधी
तु सोसल्या इतक्या वेदना
इतक सोसुन ही
तुला कसलाच खेद ना

बाळ तुझ जवा जवा
पडल होत आजारी
दिन रात जागुन
तु झालिस कैवारी

घेतली नाय माघारी
जरी होती तु अडानी
शिकवुन बाळाला
त्याला बनवलस विज्ञानी

बाळ झाल मोठ तीच
तरी तिला वाटे अजुन लहान
बाळासाठीच तिच्या
तिने तिचे सुख ठेवले गहान

त्याच्या लग्नाची तिला
आता स्वप्न पडली
स्वप्नातले स्वप्न तिने
सत्यात साकारली

सुन नावाचा प्राणी आला घरा
तेथेच एक घोळ झाला खरा
तुटली ती नाती लागली बीमारी
आईचा हात सोडून मुला बायको प्यारी

जन्माची ती नाळ
आता वेगळ राहु पाहतय
तरी बाळाच्या सुखापाई
आईच काळीज रोज फाटतय

       कवी
(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)