का असं कधी वागला नाही तो…….?

Started by शितल, May 12, 2015, 03:23:18 PM

Previous topic - Next topic

शितल

का असं कधी वागला नाही तो.......?

प्रेमाने एक नझर पाहिलंच नाही
लाजुन नजर झुकावी असं काही बोल्लाच नाही
मीच देऊन बसले हृदय त्याला
धडकाव ह्रदय त्याचही असं कधी वागलाच नाही तो.......

स्वप्नांच्या  जगात कधी शिरला नाही
मला घेऊन सोबत कधी जगला नाही
मीच बेहोश राहीली स्वप्नात त्याच्या
पडावीत माझीही स्वप्नं त्याला असं कधी वागलाच  नाही तो.......

प्रेमाच्या या रंगात कधी रंगलाच नाही
हद्द पार करून प्रेमात कधी पडलाच नाही
मीच तडपली प्रेमाला त्याच्या
गच्च मीठी मारावी त्याला असं कधी वागलाच नाही तो......

विरहाच्या भितीने रात्र-रात्र जागला नाही
प्रितीची प्रीत कधी समजलाच नाही
मीच हरवून बसले त्याच्यात स्वताला
विसरता येईल त्याला असही कधी वागला नाही तो......


...शितल ...।[/size]


SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!



मिलिंद कुंभारे

विसरता येईल त्याला असही कधी वागला नाही तो...... छान... :) :) :)

शितल