……मी एकटी……

Started by शितल, May 13, 2015, 06:17:06 PM

Previous topic - Next topic

शितल


मी एकटी ना माझे कुणी
घर एकटे मी घरात पाहुणी,

एकांत हाच माझा सोबती,
विश्वास हा राहिला जीवनी,

घेतली भरारी मी या यौवनी,
अंधार कापीत येईन जिंकुनी,

घरात आपले तंव येतील परतुनी,
आभार ईश्वरा मानू मनोमनी,

सुरवात जीवनाची केली नवदिनी,
तरीही मी एकटी ना माझे कुणी
                      ना माझे कुणी....... 


शितल......

Jabid Khan


मिलिंद कुंभारे