मातीतील प्रेरणा...

Started by virat shinde, May 14, 2015, 10:51:12 AM

Previous topic - Next topic

virat shinde

मातीतील प्रेरणा...  या संकल्पनेवर आधारित एक छोटास काव्य वाचकांस सादर करतोय. आवडल्यास नक्की शेअर करा..
विराट शिंदे - 9673797996

नको आम्हाला प्रेरणा जातीची
प्रेरणा हवी आहे आम्हा मातीची
शपथ घेऊन सांगतो तुम्हाला
गरज आहे मावळ्यांच्या साथीची

माणुसकीचा शोध कठीण झालाय
ईथे माणसाच्या रक्ताचा पुर वाहलाय
आसुसले भुमंडल सारे आण
रागावलेत म्हणे सारे ग्रह तारे

का रे माणसा चुकतोस तू
योग्य ठिकाणीच का हुकतोस तू
अल्पशा गोष्टीं करीता
मायाजालात फसतोस तू

इतिहासाची पाने चाळून घे
विचारांचा ठेवा मिळेल
महापुरुषांच्या प्ररणादाई
उजेडाचा मार्ग कळेल

जातीसाठी लढनारे झालेत षंढ
मर्दा उठ आता पुकार मातीसाठी बंड
मनुच्या छायेत गडी झालाय थंड
मातीतील प्रेरणेनेच गडी पुकारेल बंड

जातीसाठी तुम्ही नका खाऊ माती
मातीतील प्रेरणेनेच उजळतील जिवन ज्योती
निरखा तुम्ही महापुरुषांची ख्याती
कळेल काय किंमती आसते माती

  ✒ विराट शिंदे 9673797996