आता तो आणि ती जरा विखुरलेले दिसतात....

Started by manishshinde, May 14, 2015, 05:21:16 PM

Previous topic - Next topic

manishshinde

आता तो आणि ती  जरा विखुरलेले  दिसतात
भांडण जल म्हणे त्यांच्यात ,
म्हणून जरा वेगळेच बसतात
मुद्दाम एकमेकांकडे दुर्लक्ष करतात ,
समोरून चालत येताना ,
दोघे अपापली  वाटच बदलतात। ...

त्याच्या कमेंट  वर ,
आता तीच भरभरुन  हसन नसत
तिच्या नजरेला नजर मिळवण ,
याला अजुन जमत  नसत,
कधी  चुकून गेलच मैसेज तिला 
तरी याच सॉरी अन तीच ईट्स ओके रेडीच  असत ,
पण लवबर्ड्स होतो एकेकाळी आपण 
यावरच सध्या दोघांच समाधान होत असत.... 

तिच्या महागड्या डिमांड्स वर
याच नेहमी पांघरून असत
याला आवडणाऱ्या गोष्टी मात्र ,
तिच्यासाठी अंथरुण असत
समज, गैरसमज ,भांडण , अबोला
सगळ  चालू असताना
त्यांच नात  पुढे सरकत असत
बघेल टी एकदातरी मगे वळून
यावरच त्याच आयुष्य आता डिपेंड असत

एकमेकांना मदतीचा हात  देणारे
आज थोड़े वेगळेच वागतत
छोट्या छोट्या गोष्टींवरून
आता दिघे खुप चिडतात
भांडण करत  करत  दोघे कधी  ते
ब्रेक अप च्या दारापाशी येतात
पण हे प्रेम होत  की टाइमपास
यावर खुप वेळ विचार करत बसतात ...

प्रेमला उपमा देणारी  ही  दोघे
आता एकमेकांच्या प्रेमलाच दोषी ठरवू पाहतात
भूतकलात घडलेल विसरण्यासाठी
आता  दोघे वर्तमान धोक्यात घालतात
कुठलेही इमोशन नाहीं
कुठलीही अटैचमेंट नाहीं
अशी प्रेमावर  बंधन टाकतात
अन  विसरु आता  आपल्या रिलेशन ला
अशी दोघे शपथ  घेतात

तिने नोट्स दिल्या तरी "हा" घेणार नाही ,
त्याने पार्टी दिली तरी "ही" प्रेजेंट राहणार नाही
एका  छोट्याश्या वादावरून
फुललेल प्रेम संपेल  अस होईल
तर तेहि होणार नाही
कारण  नात  जरी  संपल तरी प्रेम संपत नाही

आता त्याला तिचा विचार करण्यासाठी
फ़क्त रात्रच  उरते
अन  तिहि पोळ्या करताना त्याच्याच आठवणीत बुडते
दोघांनाही अपापली  चूक आपोआप कळते
उगाच रब्बर  तानल  आपण
ते तुटेल हे माहित असतांना
असे दोघांचे मन जुळते

भेटतात दोघे पुन्हा खूप वर्षांनी
नेहमीच्या कट्ट्यावर ,
तो थोडा हिरमुसलेला अन व्याकूळ
तिला दुरून बघीतल्यावर

तीही त्याच्या ओढीने
तोही तिच्या ओढीने
घायाळ झालेल्या हृदयाने
मिठीत येतात आपापली चूक उमगल्यावर
मिठीत येतात आपापली चूक उमगल्यावर


रंगकवी :- मनिष  शिंदे

मिलिंद कुंभारे

#1
 व्वा...व्वा ...क्या बात ....छान... :) :) :)