केव्हा तरी पहाटे......

Started by शितल, May 16, 2015, 03:26:03 PM

Previous topic - Next topic

शितल


केव्हा तरी पहाटे हे नकळत असेही होते,
उषा ही आली दारी, अंगणी तव स्वप्नच होते

ती स्वप्ने घेऊन आली डोळ्यांत माझ्या पाणी,
त्या दाट धुक्यांतून शोधिले ते चित्र तुझेच होते

केव्हा तरी पहाटे, हे नकळत असेही होते...

ना जाणले कुणी ही, ठाऊक कुणास नाही,
इवल्याश्या माझ्या घरट्यात एक पाखरू विसावले होते

लागे मनास गोडी त्या सावळ्या सुंदराची
हे जाणून प्रेम सारे शब्द अबोल होते

केव्हा तरी पहाटे, हे नकळत असेही होते......
                                       
जे वेचिले तुजसाठी, जे वाहिले तुझ्याकरिता
हृदयात साठविलेले ते प्रेम अफाट होते

ही वेळ नसे रुसण्याची, ही वेळ असे प्रेमाची,
नाराज असे मन तरीही तुजसाठी गाणे रचते

केव्हा तरी पहाटे, हे नकळत असेही होते...


शितल...

शितल