…… एक आठवण……

Started by शितल, May 17, 2015, 02:43:30 PM

Previous topic - Next topic

शितल


सावलीच्या वाटेवरून हळूच मागे वळून बघ
नसेन कधी जवळ मी उगाच पापण्या लवून बघ.... 

साठले जे क्षणात काय त्यातील शल्य वगळून बघ
उरणार नाही मनात काही विश्वास हा ठेवून बघ...

पौर्णिमेचा चंद्र तू अभिमान हा पसरून बघ
चांदणी ती येईल नभात प्रतिक्षेत थोडा जळून बघ.... 

सोबतीला साथ माझी एकांत तो खोडून बघ
प्रत्येक श्वासात भासेन मी हा गार वारा झेलून बघ....


शितल...

Arvind kute.


शितल