मी मोबईल बोलतोय....।।। भाग-२

Started by शिवाजी सांगळे, May 17, 2015, 03:18:36 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मी मोबईल बोलतोय....।।। भाग-२

आज सर्व जगाभरात जवळपास 65% लोक माझा वापर करतात, आणि त्या तुलनेत आपल्या देशात माझा वापर शहरामध्येच जास्त होतो, केवळ मुंबई महानगराचा विचार केला तर प्रत्येक सुशिक्षित व्यक्ति 100% माझा वापर करतो, परंतु ग्रामीण भागात अपेक्षेपेक्षा कमी उपयोग होतो. शहरामध्ये एक बाब स्पष्टपणे ध्यानात येते, ती म्हणजे इथला तरूण यात पुरविल्या जाणा-या सर्व सुविधाचा लाभ घेतो. तो आपली बरीचशी कामे मोबाइल द्वारा करतो, जसे एस.एम.एस, वीडियो कॉन्फरसिंग, फोन बैकिंग, रेल्वे आरक्षण इत्यादि.

मोबाईल वरून पहिला कॉल केला गेला त्यास आता चाळीस वर्षे होवुन गेली, आणि आता मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा आता मोबाईलचा उपयोग सहजतेने होवु लागला आहे, ब्रॉडबैंड सेवेच्या  उपलब्धते मुळे आज आपण दुर दूरच्या क्षेत्रां पर्यंत सम्पर्क करू शकतो, संपुर्ण देशभरातील गांवा-गावातल्या प्रत्येक वर्गात सीधे प्रसारण केले जावु शकते ज्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नव्या क्रांतिची सुरवात होईल.

भविष्यात माझे स्वरूप कसे असेल? हा विचार करतांना मला नक्की अस वाटतं कि मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात माझा वापर राहील व वाढत जाईल उदा. टी.व्ही, कम्प्युटर, रेडियो इ. चा उपयोग कमी कमी होत जाईल, बैकिंग क्षेत्रातील सर्व व्यवहार माझ्या मार्फत होवु लागतील क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक इत्यदि सारे बंद होवुन देण्या घेण्याची सर्व कामे मोबाईल द्वारा होवु लगतील, ही क्रांति नाही तर काय आहे?
या सर्व गोष्टी तर आपल्या सर्व साधारण जीवन तथा शिक्षण क्षेत्रा संबधी झाल्या,  परतु आपल्या स्वास्थावर हया मोबाईलचा काय परिणाम होतो? या गोष्टीचा सुध्दा विचार आपल्याला करायला हवा. वेग वेगळया सर्वेक्षणांतील प्राप्त आकडेवारीतुन असे नोंदविले गेले आहे कि मोबाईल व त्याच्या टॉवर मुळे रेडियोएक्टिव प्रक्रियेतुन किरणोत्सर्ग (Readiation) होत असल्या कारणाने आपल्या शरीराच्या हृदय व मेंदु सारख्या महत्वपुर्ण अवयवांवर प्रभाव पडतो अशी अनुमाने काढली गेली आहेत, परंतु वैज्ञ्यानिक या गोष्टींना शत-प्रतिशत मान्य करीत नाहीत, म्हणुन या विषयां संबधी आणखी सखोल संशोधन व्हायची आवशक्यता आहे, ज्या योगे आपले जीवन आणखी सुखमय होईल.

मोबाईल वापरणा-या प्रत्येकाला माझी नम्र विनंती आहे कि माझा वापर/उपयोग आवश्यकते नुसार करा, आजु बाजुच्या लोकांचा विचार करून करा, ईतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेवुन करा. महत्वाचं म्हणजे माझा वापर एक-दुसरयांची मने जोडण्या साठी, ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी करा.

= शिवाजी सांगळे,
मो. +९१ ९४२२७७९९४१/+९१ ९५४५९७६५८९ ई.मेल.sangle.su@gmail.com   
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९