दुष्काळ

Started by Ravi kamble, May 18, 2015, 08:47:48 AM

Previous topic - Next topic

Ravi kamble

* दुष्काळ *

तु कोसळता हि रडवतो
न कोसळता हि रडवतो
ही कसली निसर्गाची करणी
बिया सकट फाटली धरणी

जगण्याचा आधार आमचा
उन्हात पोळुन करपला
कोळसा झाला पिकाचा
सदा श्याप आम्हा दुष्काळाचा

धन धान्य वाहुन गेला
धनी बी फासावर मेला
या दुष्काळान आमच्या
कित्येक पिढ्या नेल्या

बैलासकट नांगर नेला
उचलुन सावकारान
सासऱ्यालाही पिडलय आता
हृदय विकारान

सांत्वन देण्या पाई
आल्या कित्येक भरून ताफा
आश्वसनाच्या मारल्या
त्यांनी नुसत्या पोकळ वाफा

कितीही शेतकरी मेला
सरकार सदा अपयशी
कधीच संपणार नाही का
आमच नात दुष्काळाशी

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)