आज त्या आयुष्यावर मी प्रेम कराया लागले …….

Started by शितल, May 18, 2015, 02:47:19 PM

Previous topic - Next topic

शितल

हरविलेल्या स्वप्नांत मी सापडाया लागले
थांबलेले हात कविता कराया लागले
भंगले का हृदय ज्यात प्रेम होते साठले ?
आज त्या हृदयावर मी प्रेम कराया लागले...

ऐकविते मी स्वताला आज माझे संगीतं
संपलेले स्वर होते कंठ होते दाटले
तडकले का ते मन ज्यात सूर होते साठले ?
आज त्या सुरांवर मी प्रेम कराया लागले.......

जाणते ते बोल जे काळजात टोचले
विझलेली स्वप्ने होती, प्रेम होते आटले
आठवणींत तुझ्या का आयुष्य काटले ?
आज त्या आयुष्यावर मी प्रेम कराया लागले .......


शितल .........

शितल


हरविलेल्या स्वप्नांत मी सापडाया लागले
थांबलेले हात कविता कराया लागले
भंगले का हृदय ज्यात प्रेम होते साठले ?
आज त्या हृदयावर मी प्रेम कराया लागले...

ऐकविते मी स्वताला आज माझे संगीतं
संपलेले स्वर होते कंठ होते दाटले
तडकले का ते मन ज्यात सूर होते साठले ?
आज त्या सुरांवर मी प्रेम कराया लागले.......

जाणते ते बोल जे काळजात टोचले
विझलेली स्वप्ने होती, प्रेम होते आटले
आठवणींत तुझ्या का आयुष्य काटले ?
आज त्या आयुष्यावर मी प्रेम कराया लागले .......


शितल .........