श्रावणातल्या पावसातली सर

Started by shailesh@26b, May 18, 2015, 09:34:05 PM

Previous topic - Next topic

shailesh@26b

श्रावणातल्या पावसातली सर आहे
हळूवार बरसणारी तु सर आहे

तहानल्या मनाची तूच प्रित आहे
हळुच हसवूण जाणे तुझी रित आहे

सरींचा हा सुर मधुर आहे
ऐकण्यात मन माझे बेधुंद आहे

मातीचा हा दरवळणारा सुगंध
हृदयातले रोम रोम जागवते आहे

नभात छेडलेल्या सुरांतला
एक अप्रतिम गोडवा आहे

सखे रंग तुझ्या प्रितीचे
जणू ईंद्रधनु दाटले आहे
           -शैलेश बोराटे ( ठाणे )
           ७७१८०८३३११