विसरून पार गेलो मीही असाच होतो ......

Started by Ganesh A Chandan, May 22, 2015, 01:09:31 PM

Previous topic - Next topic

Ganesh A Chandan

या कवितेच्या माध्यमातून गावाकडच्या आठवणी लिहिल्या आहेत . आज मी थोडा उदास आहे या फसव्या जगात ....वेग - वेगळी मानस आयुष्यात भेटतात तुम्हालाही भेटली असतील ....अश्याच एका गर्दीत मीही हरवलोय ....आवडल्या या ओळी तर नक्की कळवा ......


विसरून पार गेलो मीही असाच होतो ......



विसरून पार गेलो मीही असाच होतो ......
वादळात शांततेचे गीत गात होतो .....
शब्दांच्या कळ्यांची फुले सुवासिक होती .....
स्वच्छंद  लेखनात तारू तारांगावत होतो ....
विसरून पार गेलो मीही असाच होतो II1II


गोठ्यात गाई -वासरांच्या मीही रमत होतो .....
निराश्या दुधाची चव मीही चाखत होतो. ....
कोंबड्याच्या बागेने मीही उठत होतो .....
विसरून पार गेलो मीही असाच होतो II1II


दवबिंदूंचा सदा मी गवतावरती पाही .....
कोकिळेची साद मी ऐकायचो सकाळी ...
पाहायचो पुन्हा मी थवे  पाखरांचे ......
सांगायचो गुज त्यांना माझ्या त्या सख्यांना .....
विसरून पार गेलो मीही असाच होतो II1II


टच्च भरलेली काठोकाठ शेतात विहीर माझी .....
सूर मारायचो आरपार,चिखल घेवून यायचो हाती ....
दिवस उगवायचा पूर्वेला उधळूनिया गुलाल ....
कसा सोहळा असायचा माझ्या त्या आकाशात .....
विसरून पार गेलो मीही असाच होतो II1II


आई द्यायची खायला गरम ज्वारीची भाकर ....
कधी बाजरीची भाकर ....
रानामधला उस, हुरडा आणि शेंगा ...
खळाळत कधी मी प्यालो पाटामधल पाणी ...
ती वेगळीच गोडी तो वेगळाच स्वाद....
विसरून पार गेलो मीही असाच होतो II1II


मैदानात होती सवंगड्यांची फौज .....
गोट्या खेळल्या गल्लीत ....विटीदांडू मैदानात ...
या झाडातून त्या झाडत मी खेळलो सुर परंबा...
कधी पतंग गेला माझा उंच भिडण्या आकाशी
तालमीत खेळलो मी कुस्त्या अश्या मजेत
अंग मुरले माझे त्या तांबड्या मातीत ....
विसरून पार गेलो मीही असाच होतो II1II

गर्दीत माणसांच्या मीही असाच गेलो .....
पाहण्या माणुसकीच्या गोष्ठी ......

माणसांनी या  माझ्या माझाच घात केला ....
तलवारीच्या जखमा नवीन नवत्या कधीच मजला .....
आज शब्दांच्या जखमांचा अंगी अंगी दह झाला ......
माझ्याच समोर आज माझाच अंत झाला ......

वादळाशी झुन्झाणारा मी .....आज झुळूकेनेच गारद झालो .....
माझ्याच सावलीने माझाच घात केला ......
छातीवरचे घाव माझ्या अजुनी ताजेच होते .....
पाठीवरती वर करणारांची फौज तयार झाली .....
विसरून पार गेलो मीही असाच होतो II1II

कधी मिसळनारच  नाही या फसव्या जगात .....
ज्यांना माहित नाही मातीतला सुवास .....
यांना माहित नाही उन पावसाचा खेळ ....
बाथरूममधला पाऊस अनुभवाती ही पिलावळ .....


Ganesh A Chandansive
7709078174

शितल