माय

Started by Sachin01 More, May 23, 2015, 01:19:00 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

जगावे कसे हे माय मला सांगे,
तव्यावरची भाकरी जशी चुलीवर भाजे,
माय म्हणे,पोरा जीणं विस्तवाच देन,
थोपटावतच राहाव याची आशा लई फार,
काठवठितच होतो तिचा उद्धार.
पीठांमधी टाकशील पाणी तवा
वाटून घेऊ नको लाज.
पोरा पिठ अन् पोटाच नातं लई अनमोल.
थांबू नको बाळा जगण विहिरीवाणी खोल.
विसरून जुणं सार जाव समोर,
तवा पोरा बनू नये माणुसकीचा चोर,
मन कितीही ओढवल तरी सांभाळायला शिक,
पोरा तुझ्या स्वार्थासाठी,
कधी मागू नको गरिबांकडून भिक
हरामाच खाऊन होतो बाळा माणसाच अंत,
उपाशी पोटातच घासानेच कर तुझ पोट शांत,
पैसा अन् नावाच वाजवू नको कवा तुणतुण,
जाणीव राहू दे पोरा आपल फाटक धुणं...
Moregs