स्पंद तुझ्या हृदयीचा

Started by विक्रांत, May 23, 2015, 10:21:36 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

स्पंद तुझ्या हृदयीचा
उतरुन या कणाकणात
अस्तित्वाचा अर्थ कळला
तू माझ्यात मी तुझ्यात

पांघरवा मेघ देह तव
मी आकाश तुझे व्हावे
वेगाळले श्वास कशाला
तुझे मी माझे तू घ्यावे

छळता दु:ख तुजला
वेदना माझ्यात यावी
डोळ्यातीलआसवे तव
माझ्या डोळ्यातून गळावी

देशील तू वेदना वा
येशील पुष्प घेवुनी
एक हे आयुष्य काय
लाख देईन उधळूनी

विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot in

ऐश्वर्या

छळता दु:ख तुजला
वेदना माझ्यात यावी
बोलाचा माझा भात
बोलाचीच कढी
नको बाई धरू
माझ्याशी तू अढी

विक्रांत

#2
??????

कविता कळत नाही तर वाचू नये .. निदान या जन्मी तरी

आणि टा ई म पास करायचा असेल   अजून यमके देतो घ्या ..कढी अढी गढी चढी  लढी आणि ड पण चालतो ढ ऐवजी  ऐश करा ..कमी पडली तर अजून देतो