त्याला माझं अस्तित्वच कळत नाही.........

Started by शितल, May 24, 2015, 03:16:34 PM

Previous topic - Next topic

शितल

ज्या क्षणासाठी जगतेय
तो काही केल्या येत नाही
जीवापाड जपते ज्याला
त्याला माझं प्रेम कळत नाही

जीवनाच्या राजकारणात
हक्कं  मागून मिळत नाही
ज्याच्या हक्कांसाठी लढते मी
त्याला माझं प्रेम कळत नाही

प्रेमाची वाट खड्तर ...
संपता संपत नाही
ज्याच्यासाठी या वाटेवर चालते मी
त्याला माझं अस्तित्वच कळत नाही 


शितल...

जयपाल

प्रेमाची वाट खडतर ...
संपता संपत नाही

प्रेमाची वाट खडतर
जरासा धीर धर
येईल तुझ्या आयुष्यात
कोणीतरी लक्ष्मीधर