काय असते ही कविता ?

Started by Vedanti, May 28, 2015, 09:13:20 AM

Previous topic - Next topic

Vedanti

असते निव्वळ शब्दांची ठेवण ,
की त्यात असते एखाद्याचे दीर्घ जीवन ...

असते केवळ शब्दांचे बिछाने ,
की असते एखाद्याचे बिनधास्त तऱ्हाने ...

असते कविता एकाने केलेले वर्णन ,
की जणू आपणच केली आहे अशी वाटणारी शब्दांची घडण ...

असते एखाद्याची निर्मळ कल्पना ,
की  जणू आपल्यालाच सुचणाऱ्या अशा काही विचार-धारणा ...

कवितांतून होते भावनांची देवाण-घेवाण ,
जिच्या मोहक अर्थाने भारावून जातात काहीजण ...

कविता आहेच अशी संकल्पना ,
संपूर्ण जगाला जी देऊ शकते अफाट प्रेरणा ...

वेदांती  

[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]